फुटे झाडोऱ्याला डोळा

 


फुटे झाडोऱ्याला डोळा-

आंधळली लाज;

तटतट सुटे गुंडी-

सैलावले काज.


पलटता पाखा, नाचे

गोंदणात मोर;

वाबटुळे वारा अन्‌

शीळ घाली खोरं.


रुतलेला जरीकाठ

निघता निघेना-

अवघडलेला दंड

मोकळा होईना.

No comments:

Post a Comment