Showing posts with label सिपना वो माय. Show all posts
Showing posts with label सिपना वो माय. Show all posts

सिपना वो माय

 सिपना वो माय


सिपना वो माय,

तुझ्या लेकी साध्या भोळ्या;

हाण्डोर भरून

देई चांदीच्या मासोळ्या.


सिपना वो माय,

लेक तुझ्या मागं हिंडे;

कराड भरुन 

देई सोन्याचे खेकडे.

तुझ्या डोहात कपारी;

जिवाला विसावा

भरवैशाखी दुपारी.


सिपना वो माय,

लेक डुंबली न्हाण्याला;

लुगडं वाळते-

फुटे पदर पाण्याला.


सिपना वो माय,

पाणी वाघाला दे पिऊ;

गरवार गाय

त्याला दिसू नको देऊ.