Showing posts with label सूक्ष्म आणि कलात्मक छेद : प्रमोद मुनघाटे. Show all posts
Showing posts with label सूक्ष्म आणि कलात्मक छेद : प्रमोद मुनघाटे. Show all posts

सूक्ष्म आणि कलात्मक छेद : प्रमोद मुनघाटे

 प्रमोद मुनघाटे,

मराठी विभाग प्रमुख,

रा.तु.म. नागपूर विद्यापीठ, नागपूर.

दि. २७ एप्रिल २२

.

प्रिय श्री. श्रीकृष्ण राऊत,

स.न.

तुम्ही पाठवलेला 'मेळघाटच्या कविता ' हा संग्रह मिळाला. अशा प्रकारचे प्रदेशनिष्ठ कवितासंग्रह मराठीत फार नाहीत. एखाद्या प्रदेशाची संस्कृती आणि लोक हे कवीच्या अनुभवाचे विषय होतात, तेव्हा समग्र मानवी संस्कृतीचा तो एक सूक्ष्म आणि कलात्मक छेद ठरतो.

त्या संस्कृतीचा मर्मथेंब झेलण्याची ताकद असलेला कवीच असे धाडस करू शकतो. 'मेळघाटच्या कवितां ' मधून तुमच्यात मला ते पुरेपूर जाणवले. 'टेंभरं पाडत ' ही कविता विशेष आवडली. तुमचे अभिनंदन आणि शुभेच्छा.

कळावे -

प्रमोद मुनघाटे

.