वरुणा ! वरुणा !!

 वरुणा ! वरुणा !!


वरुणा ! वरुणा !! 

तुझ्या डोळ्यांतून 

झरु दे करुणा !


गाईच्या पोटाला

हिरवा चारा दे; 

चिमण्या ओठाला 

दुधाच्या धारा दे.


मिठाच्या कणाला 

झोंबू दे भाकर; 

मुंगीच्या सणाला 

सांडू दे साखर.


तहानेचे बुंद 

खुरात साचू दे; 

मुळांचा आनंद 

शेंड्यात नाचू दे;


वरुणा ! वरुणा !! 

तुझ्या डोळ्यांतून 

झरू दे करुणा ! 

झरू दे करुणा !

No comments:

Post a Comment