जो जो रे ऽ बाळा ऽऽ
जो जो रे ऽ बाळा ऽऽ जो
उपाशी बाप रानात जायऽ
पोटाला पालू बांधून मायऽ
पोटात तुझ्या घालू मी काय ऽ
जो जो रे ऽ बाळा ऽऽ जो
महिना झाला अधिक उणा ऽ
पाहिला नाही कोठीनं दाणा ऽ
चुलीला नाही दिसला खाना ऽ
जो जो रे ऽ बाळा जो
सरले कोदो, मोहाचं कूट ऽ
रोटीला झालं महाग मीठ ऽ
हातातोंडाची पडेना गाठ ऽ
जो जो रे ऽ बाळा ऽऽ जो .
पोटात लागे वणवा पेटू ऽ
लागलं तोंड थुक्याला गिटू ऽ
बेसूद नको डोळे तू मिटू ऽऽ
जो जो रे ऽ बाळा ऽऽ
No comments:
Post a Comment