काडी काडी जमा कर

 काडी काडी जमा कर


काडी, काडी जमा कर;

काडी मुडीचा संसार.


शिव्याशिवीचा शिमगा;

बोलाचालीचा संसार.


मारझोड, लाथाबुक्की;

हातापायांचा संसार.


जादूटोणा, भानामती,

भूताखेतांचा संसार.


तीन दगडांची चूल;

चार दिसांचा संसार.


आग रानीवनी चरी

करी राखोळा संसार.

No comments:

Post a Comment