पाढे वाच पाढे
“पाढे वाच पाढे;
चार चणे खाय;
लेकी वनवासी
शाळा शिकून जाय.”
“कशी येऊ सांग?
घरी नाही कोणी;
किती काढू काटे
पाय अनवाणी.
झोपडीही नाही
कुठं राहू दादा?
आडोसाही नाही
कुठं न्हाऊ दादा?”
“शिपायाच्या घरी
देतो जागा तुला;
रातभर हाडं
तिथं टाक फुला.”
कोण खाते बाई
रोज खिरापत;
वाघुळात ससा
तशी तुझी गत.
No comments:
Post a Comment