गौरी चेतते
गौरी चेतते;
होळी पेटते;
शिलगत याद येते : जीव जाळत
रान हिंडले
कंद धुंडले;
उपासाचे दिस ओले संगं काढले.
जोड फोडला;
संग तोडला;
भर जत्रीमंधी देवा, हात सोडला!
ऊर पटते;
दाह साहते;
डोयातून सपनाचं पाणी वाहते.
शिडू ओतते;
याद खंडते;
गावशीवेवर मुंडा ठाण मांडते.
No comments:
Post a Comment