लामझ्याना

 लामझ्याना


लामझ्याना लामझ्याना

देजसाठी साल भरी लामझ्याना.


मरमर कष्ट करी;

नवतीला उष्ट करी;

कष्ट करी; उष्ट करी लामझ्याना.


काट्यामंधी दिस काढी;

फुलामंधी मास काढी;

दिस काढी; मास काढी लामझ्याना.


लांडोर या घर नांदे; 

मोर पायी दोर बांधे; 

घर नांदे; दोर बांधे लामझ्यान

No comments:

Post a Comment