वेळूच्या बनात .



वेळूच्या बनात 
बासरी बोलते; 
नवतीचं पान
 वाऱ्यानं हालते.

कराडीच्या आडी 
नाल्यातली रेऊः 
रानच्या फुलाला 
शेजबाज मऊ.

चित्याची झडप 
मोरपीस वाटे; 
हरणीच्या अंगी 
सायळीचे काटे.

No comments:

Post a Comment