काचाची शिशी

 काचाची शिशी


काचाची शिशी,

चिंधीची वात;

जळे चिडी अंधारात.


तडतडतो

चिंधीचा जीव;

चिमणीची चिवचिव.


जेवणरात

साजरी झाली;

वात निजू निजू आली.


बांगडीबंद,

मुकाट रात;

कुजबुज अंधारात.


No comments:

Post a Comment