घरधन्या

 


घरधन्या, तुला

अर्ध्या पाथीचीच हाव;

पडली रे झ्याल

कोस-दीडकोस गाव.


पांदणीत किर्र

डसे अंधार अंगाला;

आग लागो वाटे

बाई, कुवाँरपणाला.


इचू-काटा-पान

पाय नाहीत गिनत;

डगपिसी वढ

जाते चालीत भिनत.

No comments:

Post a Comment