पाऊस वाजतो

 


पाऊस वाजतो

सागाच्या पानी;

पोटाच्या आगीला

पुरेना पाणी.


सागाचा पानोळा

सांध्याची देर;

हिरवं इरलं

झाकते शीर.


वाटते पोटाला

पडलं भोक;

रानच्या केळीला

हेरते भूक.

No comments:

Post a Comment