कधी राजीखुशी

 


कधी राजीखुशी,

कधी शिरजोरी;

जमे नवी जोडी

घुंगरू बाजारी.


जोड पटे मना,

झाल्या खाणाखुणा;

हात हात ओढी

पालांच्या माघारी.


झप्पाटली झाडं

धाव घेती पुढं;

बिरादरी मागं

पडली बिचारी.


भगोरियाहाटी

चाले खेटाखेटी;

घर घुसू पाहे

फाटकी नादारी.

No comments:

Post a Comment