दुग्गड

 


दुग्गड ऽ

काय लागली झड ऽ

थेंब खंडेना.


सोकलं ऽ

अंगावरल ओलं

नेसू अंगाला.


झोपडी ऽ

जाऊ लागली बुडी ऽ

जी ऽ व पळाला.


नाल्यात ऽ

पाय ओढती आत

वा ऽ ट खोळंबे.


पोटात ऽ

कळा निघाल्या सात

वणवा पेटला.


ओठात ऽ

धसे उपाशी दात

लोंढा डोळ्याला.

No comments:

Post a Comment