सिपना बनात

 

सिपना बनात 

झाकट पडे,

झाकड पडे;

उजेडाबाचून 

काही ना अडे,

काही ना अडे.


हिरव्या पानाची 

येटोळी केली,

येटोळी केली;

पालूत गुंडली: 

चुंबळ झाली,

चुंबळ झाली.


खांद्याला चढली 

धुऱ्याची जोडी,

धुऱयाची जोडी;

दुडक्या चालीत 

अंतर तोडी,

अंतर तोडी.


रातच्या किड्याचं 

नांदात गाणं 

नांदात गाणं ऽ

कालाकाफट्याचं 

गोद्यात येणं,

गोद्यात येणं.


फुलल्या सासात 

फुस्कारे नाग,

फुस्कारे नाग

नजर चौफेर

फेकणं भाग,

फेकणं भाग...


थेंब दूरच्या 

दिव्याचे रंगीत

रंगीत थेंब-

तोंडाला भाकर 

अजून लांब,

अजून लांब.


No comments:

Post a Comment