टेंभरं पाडत

 


टेंभरं पाडत

कामुन्या काढत;

आंगावर काढ दुखू

शिणत-भागत.


पदरी फाटत,

उरात फुटत;

आंगावर काढ दुखू

लजित-फजित.


चारोळी चाखत,

सहेद माखत;

आंगावर काढ दुखू

चालत-बोलत.


उन्हात शिजत,

पाण्यात भिजत;

आंगावर काढ दुखू

झुजत-झिजत.


मातीनं घडत,

वार्‍यान मोडत;

आंगावर काढ दुखू

हासत-खेळत.

No comments:

Post a Comment