सालाबाद आली

 


सालाबाद आली

चैताची पुनीव:

नाचू लागे जीव.


अडक्याला गेली

दिडक्याची मोळी -

शिवाया काचोळी.


उधारीच्या घरी

उसनी पाहुणी

-आली हरखुनी.


जिभेचा चटका

उजवते होळी;

नवाईची पोळी.


पाखरासारखं

चांदणं उडालं;

गाण्यात बुडालं.

No comments:

Post a Comment