सागाहून सिधं

 


सागाहून सिधं

साधंसुधं मन;

झालं जळतण.


जित्या झऱ्यावाणी

हासणं नितळ;

वेढतं शेवाळ.


कुरणानं केली

चरण्याला बंदी;

कोंडवाडा फंदी.


पावसाच्या घाती

अस्वलाची नखं

तसं मुकं दुख.

No comments:

Post a Comment