असा फटू काढ

 


काळा-काळाभोर

शिसमाचा रंग;

माय त्याची संग-

असा फटू काढ.


हातपाय काड्या,

पोट संबू डेरा;

सटवीचा फेरा-

असा फटू काढ.


चिपडात डोळे

पसापसा खोल;

मान खाई झोल-

असा फटू काढ.


बरगडया-छाती-

पाठ-पोट-एक:

वाळली खारीक-

असा फटू काढ.


शेवाळले दात,

तोंडावर माशा;

नाही त्याची आशा-

असा फटू काढ.

No comments:

Post a Comment