तुझा वाजे पावा

 तुझा वाजे पावा


तुझा वाजे पावा

माझा घ्ुामे ढोल;

फेर धरा गोल;

रातभर नाचा.


गळाभर गाणं;

रानभर धून;

शिडूनं झिंगून

रातभर नाचा.


घ्ुांगराच्या नादी

पाय घेती झोका;

कमरेत झुका,

रातभर नाचा.


चांद गेला डुबी;

नाच आला रंगा;

होश नाही अंगा;

रातभर नाचा.


नाकाच्या शेंड्याला

कुंकवाचा थेंब;

चोळी संगं चिंब

रातभर नाचा.



No comments:

Post a Comment