घरी रडे

घरी रडे


घरी रडे

दारी रडे

आभाळाचा डोळा;

बासाड्याचे

कोंब केले

भाजीसाठी गोळा.


मंगं खाऊ,

संगं खाऊ

खाऊ झाडपाला;

उली उली,

लाऊ लाऊ

रानकंद ओला


No comments:

Post a Comment