हांड्यावर हांडा चढे

 हांड्यावर हांडा चढे


हांड्यावर हांडा चढे

चुंबळीवरती;

वैशाखला पाणवठा 

आटली भरती.


लखलखतात हांडे

पिवळेधम्मक;

सावळ्याशा मुखावर 

सांडते चमक.


कांकणाची किणकिण

खिराडीचा नाद;

सात बैनांच्या चोचीत

डुचमळे साद.


रामपारी विरघळे

साखर ओठात;

सांजवेळी हिंदकळे

दु:ख पापणीत.


चढणीला पाठ भिजे 

ओसंडतो ऊर;

झोपडीत तान्हा बाई

रडतो वं दूर.

No comments:

Post a Comment