डोंगर देवाचं उघडं धन;

 डोंगर देवाचं उघडं धन;

नदीच्या काठानं मोहाचं बन.

मोहाच्या फुलांचा पडला सडा;

फुलांच्या मिसानं अस्वल खडा.

मोहाच्या फुलांची पडली रास:

मातीला लागला मोहाचा वास.


डोंगर देवाचं उघडं धन:

नाल्याच्या काठानं मोहाचं बन.

मोहाच्या फुलाची रानात दाटी;

वेचता वेचता भरली पाटी.

मोहाच्या फुलांची वेचली रास:

पाटीला लागला मोहाचा वास.


डोंगर देवाचं उघडं धन:

रस्त्याच्या काठानं मोहाचं बन.

मोहाच्या फुलाचा चाकानं चुरा;

मोटर हाणतो जांगडी बुरा.

मोहाच्या फुलांची उघडी रास:

वा-याला लागला मोहाचा वास.

No comments:

Post a Comment