मोठ्याच्या घरी
मोठ्याच्या घरी
पाहुणे आले;
दौडले रानी
बंदुक - भाले.
विदेशी झिंग,
गप्पांना ऊत:
गुदस्ता होतं
हरीण मस्त.
चावती दात
कवळा घास:
मसाल्यातले
मोराचे मांस.
पोरांच्या हाती
नाचती पिसे;
सातमजली
पाहुणा हसे.
पाहुण गेले...
गरदा उडे:
रानपाखरु
खोप्यात रडे.
No comments:
Post a Comment