अरे पावसाच्या देवा

अरे पावसाच्या देवा

असा रुसू नको बापा

धरतीच्या पोटातून

पहा निघतात वाफा


अरे पावसाच्या देवा

नको पोटावर मारू

लेकराला-वासराला

सांग आता काय चारू?


अरे पावसाच्या देवा

डोळे उघड रे नीट

थेंबाथेंबासाठी करे

माझी माय पायपीट


अरे पावसाच्या देवा

अशा मारू नको थापा

कधी येशील येशील

जीव गेल्यावर बापा!


अरे पावसाच्या देवा

दे रे आम्हा जीवदान

तुझ्या मायच्या दूधाची

तुला घालतो मी आण

No comments:

Post a Comment